राज्याचा अर्थसंकल्प : जाहीर, शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत कर्जमाफी, जाणून घ्या महत्वाच्या तरतुदी

Foto
मुंबई  : महायुती सरकार सत्तेत आल्यापासून कर्जमाफीच्या निर्णयाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्याचे नवनिर्वाचित अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडताना कर्जमाफीच्या  निर्णयाची घोषणा केली. आम्ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबवण्याचं आश्‍वासन दिले होतं. त्यासाठी समिती गठीत केली आहे. 

30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकित असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करत आहे, अशी घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात त्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन पर लाभ दिला जाणार असल्याचेही फडणवीस यांनी जाहीर केले. 

कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर लाभ देण्यासोबत राज्यातील बँकिग यंत्रणा सक्षम असावी, यासाठी समितीच्या शिफारसीनुसार निर्णय घेण्यात येईल. शेतकरी वारंवार कर्जबाजारी न होता त्याला कायमचा कर्जमुक्त करण्याचा सरकारचा संकल्प असून समितीच्या शिफारसीनुसार दीर्घकालीन उपाययोजन केल्या जात आहेत, असेही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

महायुती सरकार सत्तेत आल्यापासून विरोधकांकडून महायुती सरकारला शेतकरी कर्जमाफीच्या योजनेचे काय झाले, असा जाब विचारत होते. निवडणूक झाल्यानंतर सरकार शेतकरी कर्जमाफीचे आश्‍वासन विसरले, अशी टीका विरोधकांकडून केली जात होती. मात्र, आज देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा करुन विरोधकांच्या या टीकेतील हवा काढून घेतली आहे. मात्र, ही कर्जमाफी नेमकी कोणाला मिळणार, याचे निकष आणि तपशील अद्याप समोर येणे बाकी आहे. 

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अर्थसकंल्पाला राज्य मंत्रिमंडळाकडून मंजुरी देण्यात आली आहे.  यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अर्थराज्यमंत्री आशिष जैस्वाल आणि इतर मंत्र्यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हा अर्थसंकल्प  राज्याला 2047 च्या विकासाकडे  नेणारा आहे. 
अर्थसंकल्पातील महत्वाचे निर्णय 
- महात्मा फुले यांच्या जन्माला 200 वर्ष पुर्ण होत आहे.  यासाठी एक समिती स्थापन करुन विविध कार्यक्रम आयोजन करण्यासाठी निधी दिला जाईल
- बाबासाहेब आंबेडकर यांच्या शताब्दी वर्षा निमित्त रायगड येथे पायाभूत सुविधा केल्या जातील
- सामाजीक समरसता वर्ष म्हणून साजरा केला जाईल
- बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच काम पूर्ण झालं आहे काही योजना सुरु केल्या जातील 
आपली अर्थ व्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर होणार असून त्यातत आपला वाटा  देशात सर्वात मोठा असेल. यामध्ये विकसीत महाराष्ट्राच प्रतिबिंब या अर्थसंकल्पात पाहायाला मिळणार आहे. राज्य सरकारने राज्याचे व्हिजन डॉक्युमेंट तयार केले असून प्रादेशिक संतुलित विकासासाठी चार प्रमुख स्तंभ ठरवले आहेत. या चार केंद्रांखाली 16 उपकेंद्र ठरवले असून प्रत्येक अर्थसंकल्पात त्याची छबी दिसणार आहे. 

पायाभूत सुविधा

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा तिसरा टप्पा मंजूर 
ग्रामसडक योजनेअंतर्गत 30 हजार गावे जोडली जाणार 
2450 किमी रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून 23 हजार पूलांचे काम हाती घेण्यात आले आहे. मुंबई पुणे जलदगती ट्रेनसाठी तरतूद करण्यात आली आहे. 

शेती 

गोपीनाथ मुंडे अपघात योजनेत शेतमजूर यांचा हा सहभाग करणार
पाणंद रस्त्यांना मान्यता दिली आहे
30 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना हवामान, बाजारभाव माहिती दिली जात आहे
चारही कृषि विद्यापीठात एआयची मदत घेतली जात आहे
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे
ॲग्रीस्टॅक योजना राबविण्यात येत आबे
1 कोटी 31 लाख फार्मर आयडी फेब्रुवारी पर्यंत झाले आहे
चार वर्षांत भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील
आगामी दोन वर्षांत महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियानाची सुरुवात
महिला गोपालक, शेळी पालकांसाठी विशेष योजना राबविण्यात येईल

उद्योग 

राज्याचे नवे गुंतवणूक धोरण जाहीर करण्यात आले आहे
प्रत्येक जिल्ह्यात सुक्ष्म व लघू केंद्र स्थापन केले जातील
सूक्ष्म, लघु आणि मध्य उद्योग केंद्र उभारणार, 50 लाख प्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार 
प्रधानमंत्री सौर योजनेअंतर्गत रुफ टॉप सोलर 
बांबू विकास प्रकल्प वाढवणार 

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल 
मुंबई आणि पुण्यात 50 अब्ज डॉलरचे केंद्र तयार करण्याचे उद्दिष्ट
गडचिरोली नवं स्टील हब म्हणून उदयास, 2 लाख कोटींची गुंतवणूक 70 हजार रोजगार

क्रिएटिव्ह इंडस्ट्री 
मुंबईत केंद्राच्या मदतीने इंडियन इन्स्टिट्यूट क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी सुरु 
पुणे हे जीसीसीसाठी देशात सर्वाधिक पसंतीचे शहर 
जगात गेमिंग क्षेत्रात अव्वल होण्यासाठी महाराष्ट्रात 295 पेक्षा जास्त गेमिंग स्टुडिओ तयार करणार

पर्यटन 
सातारा जिल्ह्यातील वासोटा किल्ला पर्यटकांसाठी रोप वे प्रकल्प उभारणार 
नागपूरमध्ये रामटेकमध्ये तिसरी चित्रसृष्टी उभारणार 
12 ज्योतिर्लिंगापैकी 5 

बुलेट ट्रेन आणि तिसरी मुंबई 
राज्यात शहरी विकास 70 टक्के लोकसंख्या होणार आहे 
त्यामुळे शहरी सेवा डिजीटल करणार आहे
- बुलेट ट्रेन तीन स्थानकांचं 2027 पर्यंत पूर्ण हेईल
- तिसरी मुंबई म्हणुन उरण या परिसरात विकास होतील
- मुंबईत बेकायदेशीर बांधकाम होऊ नये यासाठी प्रयत्न  

चौथी मुंबई 
चौथी मुंबई वाढवण येथे होईल
एमएमआरमध्ये 10 लाख नवी घरे उभारणार
नवी अनधिकृत बांधकामे होणार नाहीच याचा रोडमॅप तयार होणार

बुलेट ट्रेन, तिसरी आणि चौथी मुंबई 
- राज्यात शहरी विकास 70 टक्के लोकसंख्या होणार आहे
- त्यामुळे शहरी सेवा डिजीटल करणार आहे
- मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन तीन स्थानकांचं 2027 पर्यंत पूर्ण हेईल
- तिसरी मुंबई म्हणून उरण या परिसरात विकास होतील
- तिसरी मुंबईत रायगड पेण व नवी मुंबई विमानतळ ही ग्रीन फिल्ड म्हणून विकसित करणार
- मुंबईत बेकायदेशीर बांधकाम होऊ नये यासाठी प्रयत्न
- चौथी मुंबई वाढवण येथे होईल 
- एमएमआरमध्ये 10 लाख नवी घरे उभारणार 
- नवी अनधिकृत बांधकामे होणार नाहीच याचा रोडमॅप तयार होणार

जलमार्ग

340 किमी जलमार्गाचे जाळे विस्तारणार 
1 कोटी 60 लाख पर्यंत असलेली प्रवासी संख्या 7 कोटीपर्यंत वाढेल

सौर ऊर्जा 

2047 पर्यंत स्वच्छ उर्जेचे उद्दीष्ट आहे
32 हजार 756 कोटी मुख्यमंत्री सौर उर्जेसाठी खर्च
यावर्षी देखील 20 हजार कोटींची तरतूद केली आहे
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत गिनीज बुकमध्ये महाराष्ट्राची नोंद झाली आहे

लातूर, बारामती आणि अमरावती विमानतळावर रात्रीच्या उड्डाणांसाठी सुविधा
25-12-25 पासून नवी मुंबई विमानतळावरुन देशांतर्गत उड्डाणांना सुरुवात
पुरंदर-पुणे विमानतळासाठी विशेष प्राधिकरण, भूसंपादन अंतिम टप्प्यात
गडचिरोली विमानतळासाठी भूसंपादन
शिर्डी, नाशिका, संभाजीनगर, अमरावती, अकोला, रत्नागिरी, यवतमाळ, कराड विमान विस्तारीकरण